पूर्वीच्या नेतृत्वात कणखरपणा नव्हता. आता आपण दहशतवादी हल्ल्याचा केवळ निषेध नव्हे, तर सर्जिकल स्ट्राइक करून, बालाकोटमध्ये जाऊन हल्ला करू शकतो. पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. हे अगोदरच समजले असते,
तर त्यांचा एखादा नेता रॉकेटला बांधून तिकडे पाठविला असता, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगाविला.वाळकी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या चार वर्षांत मी जे प्रश्न सोडविले, ते सर्व पंचवीस वर्षे जुने होते. नगरच्या साकळाई पाणी योजनेचा प्रश्नही पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या आत तो सोडविला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यावेळीही आहे, पण ती सामान्य माणसांत आहे, त्यामुळे ती विरोधकांना दिसत नाही. लगावला. सैन्याचा विशेषाधिकार काढणे आणि देशद्रोहाचे कलम काढून टाकणे, हा निवडणुकीचा जाहीरनामा असूच कसा शकतो, असेही ते म्हणाले.