Skip to content Skip to footer

स्टंटबाजी करणाऱ्या पार्थ पवारांच्या प्रचारकाचा अभ्यास घेणे आवश्यक : आमदार गोऱ्हे

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते स्टंटबाजी करताना दिसतात तर मावळ मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार हे आपल्या विशेष प्रचार पद्धतीमुळे चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या बरोबर नेमण्यात आलेल्या प्रचारकाचा आधी अभ्यास घेणे आवश्यक असल्याचं सांगत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पार्थ पवार यांच्या प्रचार पद्धतीवर खेद व्यक्त केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये त्या बोलत होत्या. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पार्थ पवार यांच्या बरोबर जो कोणी प्रचारक नेमलेला आहे, तर त्याचा आधी अभ्यास घेण्याची गरज आहे. कारण तो उमेदवाराला कधी घोड्यावर बसायला लावतो, तर कधी धावायला लावतो, कधी भजन करायला लावतो असं उमेदवाराला वागवणे बरोबर नाही. कारण त्या उमेदवाराची मजा घेतल्याचं नजरेत येत असत, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघातून आघडीकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवार यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने ते प्रचारक जस सांगेल त्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे पार्थ पवार हे ट्रोल होत आहेत. पार्थ पवार हे प्रचारच्या रणधुमाळीत कधी धावताना दिसत आहेत तर कधी घोडेस्वार होत आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर पार्थ पवार चांगलेच व्हायरल होत आहेत. याच अनुषंगाने नीलम गोऱ्हे म्हणाल्या की पार्थ पवार यांच्या प्रचारकाचा अभ्यास घेणे गरजेचे आहे. आज इतरांना राजकारण शिकवणारे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या नातवाला राजकारणाचे धडे देऊन निवडणुकीला उतरवले असते तर पवार घरण्याचे हसू झाले नसते.

Leave a comment

0.0/5