Skip to content Skip to footer

आघाडीची पापे धुण्यात गेली पाच वर्ष – आदित्य ठाकरे

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या कारकीर्दीत झालेली पापे धुण्यासाठी आमची पाच वर्षे गेली आहेत. आता आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र बनविण्यासाठी युतीची सत्ता केंद्रात येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जर काँग्रेस आघाडीची सत्ता आली, तर काश्मीर देशापासून तुटेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिराळा येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. शिवाजीराव नाईक, धैर्यशील माने, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, राहुल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे हे शिराळा येथे आले होते. या सभेला उद्देशून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी आमदार नाईक म्हणाले, आम्ही जिवंत नागाची पूजा करतो, मात्र कुणी डिवचले तर सोडत नाही. आमच्यावर टीका करणारे वाळव्याच्या नेत्याच्या जिवावर नाचत आहेत. धैर्यशील माने यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे परंतु युवकांचा मिळणाऱ्या पाठीब्यामुळे माने यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Leave a comment

0.0/5