Skip to content Skip to footer

रखडलेले प्रकल्प म्‍हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांची स्मारके – नितीन गडकरी

महाराष्ट्रात खूप सिंचन योजना आहेत, परंतु हे प्रकल्प म्‍हणजे आघाडी सरकारच्या काळात रखडलेले काँग्रेस – राष्ट्रवादीची स्मारके बनली होती. अशा प्रकल्‍पांना भाजप सरकारने पूर्ण केले. यावेळी राजू शेट्टी हे प्रश्न समजून न घेता आंदोलन करतात असा आरोप गडगकरींनी केला. तसेच काँग्रेसने देशात जातीयवाद पेरला आहे. अशा परिस्‍थितीत समाजाला नवीन दिशा देण्यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहन त्‍यांनी केले. त्‍याचबरोबर देशात आदर्श खेडी आणि आदर्श शहरे आपण निर्माण करू असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी यावेळी केले. ते भाजप उमेदवार संजयकाका यांच्या प्रचारार्थ पश्चिम महाराष्ट्रातील विटा येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

या सभेला चंद्रकांतदादा पाटील, सदाभाऊ खोत, आमदार अनिल बाबर, अमोल बाबर, सुहास बाबर, माजी आमदार भगवानराव साळुंखे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते, राजाराम गरुड, तानाजी पाटील, अमोल मोरे, मनीषा बागल, विनोद गुळवणी, शंकर मोहिते, अनिल म.बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ना.सदाभाऊ खोत म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे सरकार आहे. या सरकारवर भ्रष्‍टाचाराचा कोणताही आरोप नाही त्‍यामुळे भाजपला साथ द्‍या चंद्रकांतदादा म्हणाले, गावा गावात मांडणी करायची गरज नाही, सरकारचे लाभार्थी झालेले भाजपला कोण विसरू शकत नाहीत. केंद्राने आणि राज्याने केलेल्या योजना कोणच करू शकत नाही. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, आर्थिक मागास म्हणून दिलेले आरक्षण यामुळे सरकारचे ऐतिहासिक निर्णय चांगले आहेत.

Leave a comment

0.0/5