Skip to content Skip to footer

अजित पवार नव्हे तर मी आमदार होणार कि नाही ते पुरंदरची स्वाभिमानी जनता ठरवेल-विजय शिवतारे

 

बारामती मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपा पक्षाच्या नेत्यानं बरोबर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी कंबर कसली आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या कांचन कुल यांना उतरवून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी तगडे आव्हानच निर्माण केले आहे. त्यातच कुल यांच्या प्रचाराला “कांचनताई दिल्लीमे और सुप्रियाताई गल्लीने” अशी नवीन टॅगलाइन शिवतारे यांनी बनवली आहे. ही टॅगलाइन राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजित पवार यांच्या जिव्हाळी लागलेली दिसून येत आहे. शिवतारे तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो” अशी धमकीच राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी शिवतारेंना दिला आहे.

अजित पवारांच्या धमकीला उत्तर देताना मंत्री शिवतारे म्हणाले की, पवार कुटुंबियांना इतिहासात कधीही नव्हता एवढा विरोध आता होऊ लागल्याने अजित पवारांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. फक्त अजित पवारचंं नव्हे तर संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक तोल ढासळला आहे. लोकशाहीमध्ये जनता ठरवते आमदार कोण होणार आणि कोण नाही होणार ते. अजित पवार नव्हे तर मी आमदार होणार कि नाही ते पुरंदर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ठरवेल अशा टोला विजय शिवतारे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Leave a comment

0.0/5