Skip to content Skip to footer

पवार कुटुंबातील एकही सदस्य लोकसभेत जाणार नाही – चंद्रकांतदादा पाटील

शरद पवार कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले आहे. येथील तपोवन मैदान डी डी शिंदे सरकार शाळेतील मतदान केंद्रात कुटुंबासह त्यांनी मतदान केलं. त्यांच्या बरोबर पत्नी अंजली आणि त्यांच्या आईने सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पाटील यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच राज्यात युतीला एकूण ४५ जागा मिळतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात युतीला १० जागा मिळतील असे त्यांनी सांगितले. पश्चिमे महारष्ट्रातील सर्वच्या-सर्व जागा जिंकून आणण्याची जबाबदारी ही भाजपाने चंद्रकातदादा पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.

पवार कुटुंबाने या निवडणुकीत घराणेशाहीला उत आणला. हे सर्व लोकांच्या डोळ्यावर येईल आणि पराभवाची जाणीव झाल्यानेच शरद पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य यावेळी लोकसभेत जाणार नाही अशी परिस्थिती आहे, असे स्पष्ट मत चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापुरातील दोन्ही जागा वन वे अर्थात एकतर्फी निकाल लागून युतीलाच मिळणार अशी आपल्याला खात्री असल्याचे मतदानानंतर बोलताना पाटील म्हणाले. साताऱ्यात चुरशीची लढत होईल असे वाटत होते. मात्र शेवटच्या दोन दिवसात सर्वच समिकरण फिरले आणि युतीचाच उमेदवार साताऱ्यातही निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. साताऱ्यात उदयनराजे यांचा पराभव निश्चित आहे असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की एखादे नाटक किंवा ऑर्केस्ट्राला गर्दी जमते. त्यातील पात्र चांगले काम करते. म्हणून त्याला कोणी मत देत नाही अशी टीका त्यांनी केली

Leave a comment

0.0/5