माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतून राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात आठ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे सर्वेक्षण झाले आहे. सुमारे २४ लाख कुटुंबांना या मोहिमेअंतर्गत भेटी देण्यात आल्या आहेत. अशी माहिती ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल या मोहिमेच्या जिल्हा परिषदामार्फत होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मोहिमेला अधिक परिणामकारक करा तसेच अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घ्या असे सांगितले.
जिल्हा परिषदांना १ कोटी ८४ लाख कुटुंबांना भेटीचे उद्दिष्ट दिले आहे. पैकी २४ लाख कुटुंबांच्या भेटी झाल्या असून १३ टक्के उद्दिष्ट पार पडले आहे. यात सारी आणि आयएलआयचे १५ हजार ३९२ रुग्ण तर कोविडचे ६ हजार ९३८ रुग्ण आढळले. सहव्याधी असलेल्या २ लाख ६ हजार २११ व्यक्ती आढळल्या. यामध्ये सर्वेक्षण झालेल्या लोकसंख्येत पुणे, नाशिक, कोल्हापूरमधून सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले