Skip to content Skip to footer

संजय निरुपम यांचा प्रचार केल्याने कुस्तीपटू नरसिंग यादव नव्या वादात

संजय निरुपम हे नाव मुंबईच्या राजकारणात तसेच काँग्रेस पक्षात वादग्रस्त व्यक्ती म्हणून ओळखले जाते. आगामी लोकसभा निवडणुकीला मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे तगडे आव्हान संजय निरुपम यांना असणार आहे. त्यामुळेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही दिवसापूर्वी मराठी तसेच हिंदी बिगबॉस मधील मंडळी संजय निरुपम यांच्या प्रचाराला रस्त्यावर उतरली होती. त्यातच कुस्तीपटू नरसिंग यादव यांनी सुद्धा निरुपम यांच्या प्रचाराला हजेरी लावली होती परंतु आता यादव यांनी लावलेली हजेरी त्यांना भारी पडताना दिसत आहे.

नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करता येत नाही. असे असून देखील काँग्रेसचे उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात नरसिंह हे सहभागी झाले होते. यादव हा सध्या मुंबई पोलीस दलात एलए – ५ मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर कार्यरत आहे. त्यामुळे पोलीस दलात कार्यरत असून देखील नरसिंग यादव हा उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम याचा प्रचार करत असल्याचं पुढे आल्यानंतर त्याच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5