सोलापूर : राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे उघड्यावर लघुशंका करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राम शिंदेंनी रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याचा आरोप आहे.
स्वच्छ भारत अभियान भाजप सरकारतर्फे राबवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे मंत्रीच या अभियानाला हरताळ फासत असल्याची ओरड होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=ccALRsb1ZwA
गंगा स्वच्छ अभियानाच्या अधिकाऱ्यांचं गंगेतच मूत्रविसर्जन
राम शिंदे सोलापुरातील बार्शी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जलयुक्त शिवार योजनेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या मळेगावच्या पाहणीसाठी गेले होते.
पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांच्या गाडीचा ताफा एके ठिकाणी थांबला. राम शिंदे गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला मूत्रविसर्जन केलं, असा दावा केला जात आहे.
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह खुल्या भिंतीवर मूत्रविसर्जन करताना कॅमेऱ्यात कैद. हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठ्यांच्या तलवारी : इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट दाखला!!!
https://maharashtrabulletin.com/maratha-empire-swords-engineering/
यापूर्वी, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह हेसुद्धा बिहारमध्ये खुल्या भिंतीवर मूत्रविसर्जन करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.