Skip to content Skip to footer

जो काकांचा नाही झाला तो पवारांचा काय होणार…

राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे सध्या  निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्यावर टीका करून पवारांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचा केवीलवाना प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. ‘ईडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, यासाठी उद्धव यांनी भाजपसोबत युती केली नसून केवळ ‘ईडी’च्या भितीच्यामुळे उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात दाखल झाल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली. चार मंत्रीपदाच्या तुकड्यांसाठी शिवसेना भाजपच्या मागे फिरत आहे अशी टीका सुद्धा केली.

महाराष्ट्रात घरा-भारत भांडणे लावून घरे फोडण्याचा हातखंडा आपल्या अध्यक्ष महोदय शरद पवार यांच्याकडे चांगलाच आहे. त्यातूनच आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना दगा देऊन राष्ट्रवादी पक्षात सामील झाला. आज राष्ट्रवादी पक्षात सामील होऊन सुद्धा आपल्याच घरातील व्यक्तींच्या म्हणजे पंकजाताई मुंडे आणि प्रितमताई यांच्या विरोधात तोफ डागत आहात. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला राजकारणात आणले त्यांना आपण दगा दिला तर पवारांना का देऊ नाही शकत? आज उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांचा थोडा तरी विचार करावा.

छगन भुजबळ सारख्या जुन्या कार्यकर्ताला जेव्हा जेल मध्ये शिक्षा भोगत होता तेव्हा आपले जाणते राजे म्हणजे पवारांनी त्यांना वाचवायला काय केले. आज नाशिक मधील सभेला भुजबळांना जेल मध्ये ज्या यातना सहन केल्या (घोटाळा केल्यामुळे) त्या विषयी चुकार न बोलणाऱ्या आपल्या जाणत्या राजाला कार्यकर्त्याची किती कायजी आहे हे त्यांच्या वागण्यातुन दिसून येते. आपल्याला राजकारणात अजून भरपूर काही शिकायचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना १० वेळा नाही तर १०० वेळा विचार करा. आपण आज कुठेतरी पवार साहेबांना खुश करण्याच्या भानगडीत बड्या नेत्यावर टीका करताना थोडातरी विचार करा.

Leave a comment

0.0/5