Skip to content Skip to footer

मनसेचा पर्दाफाश करताना काँग्रेस का घाबरते – विनोद तावडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यभर सभा घेऊन भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सडाडुन टीका करत आहे. सध्या “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे भाजपाची पोलखोल करत आहे. या पोलखोलची धास्ती घेत भाजपा सुद्धा राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ येणाऱ्या २७ एप्रिलला जाहीर सभेत दाखवणार आहे. अशी माहिती विनोद तावडे यांनी दिलेली आहे. परंतु राज ठाकरे यांचे हे व्हिडिओ दाखवण्याची परवानगी निवडणूक आयोगाने देऊ नये अशी मागणी मुंबई दक्षिणचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी केले आहे यावर थेट सवाल मंत्री तावडे यांनी उपस्थित केलेला आहे.

भाजप २७ एप्रिल रोजी मनसेच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार असताना आता काँग्रेस का घाबरली आहे. मनसे व काँग्रेस एकत्र आहेत का असा थेट सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. भाजपने उद्या सभा घेतली तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही असा आक्षेप घेत काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पण जर तुमचे खरे असेल तर मग घाबरता कशाला? तुम्ही खोटे बोलता म्हणून तुम्ही घाबरता. त्यामुळेच तुमच्या खोटारडेपणाचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत असेही तावडे म्हणाले.

Leave a comment

0.0/5