Skip to content Skip to footer

शिरुर लोकसभेत कुणी कितीही ‘कोल्हे’कुई केली, तरी निवडणूक आपणच जिंकणार : आढळराव पाटील

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खा.शिवाजीराव पाटलांनी कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिरुर लोकसभेत कुणी कितीही कोल्हेकुई केली, तरी निवडणूक आपणच जिंकणारच असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्याकडे तगडा उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र , आता तो तगडा उमेदवार हे अमोल कोल्हे असल्याचे बोललं जात आहे.

Leave a comment

0.0/5