Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे प्रचाराच्या बँनरवरून अडचणीत

राष्ट्रवादी पक्षाचे शिरूर मतदार संघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीत आपल्या अडचणीत वाढ करून घेतली आहे. त्यांच्या या वागण्यामुळे शिरूर मतदार संघातील जनता आणि राज्यातील तमाम शिवप्रेमीची मने दुखावली गेली आहेत हे निश्चित, आज शिरूर मतदार संघात कोल्हे यांची प्रचार रैली काढण्यात आली होती या रैलीला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, लतिका सावंत आणि राजेश्री लांडगे यांनी हजेरी लावली होती. परंतु त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर मालिकेत काम करत असलेल्या पात्रांच्या नावाचा वापर कोल्हे यांनी आपल्या राजकीय स्वार्थसाठी केलेला दिसून येत होता. त्यामुळे असंख्य शिवशंभो प्रेमींची मने दुखावली गेली आहेत.

डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षाला राम-राम करत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. तसेच अजित पवार त्यांनी सुद्धा शिरूर मतदार सांघातून कोल्हे यांचे नाव खासदारकीसाठी जाहीर केले होते. परंतु आज आपल्या राजकीय फायदयासाठी कोल्हे काम करत असलेल्या मालिकेतील पात्रांचा नावासकट वापर करत असल्यामुळे ही बाब सध्या शिवप्रेमींना खटकलेली दिसून येत आहे त्यामुळे कोल्हे यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते

Leave a comment

0.0/5