Skip to content Skip to footer

राज मित्रा तू खरंच चुकलास – आशिष शेलार

काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेऊन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागत आहे. राज ठाकरे हे भाजपावर करत असलेल्या आरोपांचा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजपा स्टाईलने खरपूस समाचार घेतलेला आहे. गेली २० दिवस राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर असत्य सादर केले आहे. ३२ वेळा खोटी माहिती जनतेसमोर मांडण्यात आलेली आहे. राज यांनी कोणत्या अधिकृत जागेवर माहिती घेतली व खोटे दाखवण्याचा प्रयत्न केला. आत राज ठाकरे तुमची पोलखोल आम्ही केली आहे. १९ प्रकरणावर आम्ही आढावा घेतला आहे. सत्याच्या आधारावर राजकारण करणे आमची संस्कृती आहे. राज मित्रा खरंच त चुकलास अशी खंत मी मांडतो असे आशिष शेलार यांनी बोलून सुद्धा दाखविले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भर सभा घेऊन भाजपाची पोलखोल केली होती. तसेच त्यांनी लाव रे तो विडिओ असे म्हणत भाजपच्या खोट्या योजनांची माहिती दिली. या राज ठाकरे यांनी दाखवलेल्या व्हिडिओला उत्तर म्हणून बघाच तो व्हिडिओ असा कार्यक्रम रंग शारदा सभागृहात आयोजित केला होता. आशिष शेलार म्हणाले आता बघाच तो विडिओ ही महाराष्ट्रात होणारी पहिली सभा असेल. मोदींवर टीका केली त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. कारण मोदी चांगले काम करतात म्हणून ते विरोधकांना खटकत आहे असे सुद्धा आशिष शेलार यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5