Skip to content Skip to footer

पार्थ पवारांच्या प्रचाराच्या सभा फ्लॉप, शेकापा नेत्यांच्या मंचावर डुलक्या

मावळ मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला नागरिकानी अक्षरशः पाठ फिरवलेली दिसून येत होती. येन सभेला बड्या नेत्यांची भाषणे चालू झाल्यावर सुद्धा अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले शेकापचे आमदार डुलक्या घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत होते. एकीकडे शिवसेना उमेदवार बारणे यांच्या सभेला जमत असलेली लाखोंची गर्दी, तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्या सभेला मिळत असलेला तुल्य प्रतिसाद यामुळे मावळ मतदार संघातील चित्र स्पष्ठ दिसून येत आहे.

लोकसभेच्या चौथ्या टप्यात मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या जागेवरून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे मैदानात आहेत. राष्ट्रवादीकडून कामोठे इथं प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाआघाडीच्या या सभेला लोकांची तुरळक गर्दी असल्याने नेत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. या सभेला खरंतर राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, धनंजय मुंढे , सुप्रिया सुळे , जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि शशिकांत शिंदे येणार होते. मात्र प्रमुख नेत्यांनीच सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. सुनिल तटकरे आणि शशिकांत शिंदे यांचीच फक्त सभेला उपस्थिती होती.

त्यात उदयनराजे येणार नसल्याचे कळताच काही लोकांनी काढता पाय घेतला. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डुलक्या मारण्यात व्यस्त होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या सभेचा चांगलाच बेरंग झाला. मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्वी पेक्षा अधिक मताने बारणे निवडून येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a comment

0.0/5