Skip to content Skip to footer

राहुल गांधी तुम्ही भारतीय असल्याचं सिद्ध करा, गृह मंत्रालयाची नोटीस

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या वक्तव्यामुळे अनेकवेळा अडचणीत आलेले आहे. काही दिवसापूर्वी “चौकीदार चोर है” या आपल्या वक्तव्यामुळे त्यांना कोर्टाची माफी सुद्धा मागावी लागली होती. पुन्हा आता ते एका नवीन प्रकरणात अडकलेले दिसून येत आहे. गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करा असे म्हटलं आहे. सोमवारी सुब्रम्हण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दल आणि शैक्षणिक पात्रतेबद्दल सवाल उपस्थित केला होता. शिवाय, स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तशी तक्रार देखील सादर केली होती. त्यानंतर आता गृहमंत्रालयानं राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता १५ दिवसांमध्ये उत्तर दयावे लागणार आहे. राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा दावा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी आपल्या पत्रात केला आहे.

यावर प्रतिक्रया देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून कोणतंही राजकारण नको. ही एक साधी प्रक्रिया आहे असे केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. निवडणुकीत उभा राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय हवा. त्यामुळे जुना पक्ष असलेल्या काँग्रेस अध्यक्षांना याबद्दल कोणताही आक्षेप नसावा असं नक्वी यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधींविरोधात उपस्थित केले गेलेले प्रश्न हे गंभीर आहेत. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टी राजकारणाशी जोडू नयेत असं देखील नक्वी यांनी म्हटलं आहे. २००३ मध्ये ब्रिटनमध्ये बँकऑप्स नावानं कंपनी रजिस्टर झाली. यामध्ये राहुल गांधी यांचं नाव आहे. तर, पत्ता ५१, साऊथगेट स्ट्रिट, विंचेस्टर, हैरपशायर S023 9EH असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे. २००६ मध्ये जी रिटर्न फाईल करण्यात आली होती. त्यामध्ये राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक आहेत असा उल्लेख असल्याचं सुब्रम्हण्यम स्वामी यांनी म्हटले आहे

Leave a comment

0.0/5