Skip to content Skip to footer

शरद पवारांना पंतप्रधान पदाचा लायक मानत नाही – प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच पंतप्रधान कोण होणार अशी चर्चा सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी होताना दिसत आहे. यावर अनेक राजकीय नेते तर्क-वितर्क लावताना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चंद्रबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि बहुजन पक्षाच्या नेत्या मायावती यां तिघांपैकी एकाचे नाव जाहीर होऊ शकते असे बोलून दाखविले होते. पवारांच्या या वक्तव्यावर संपूर्ण देशात पंतप्रधान उमेदवारांच्या चर्चेला ऊत आला होता. निवडणुकीच्या निकाला नंतर शरद पवार हे सुद्धा पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतील अशी चर्चा सुद्धा चालू आहे. यावर भाष्य करताना वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

या विषयावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी शरद पवारांना पंतप्रधान पदाच्या लायक समजत नाही तसेच चंद्राबाबू नायडू, ममता बॅनजी आणि मायावती हे सुद्धा पंतप्रधान होणार नाही असे मत आंबेडकर यांनी बोलून दाखविले होते. एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी ‘ममता बॅनर्जी, एन. चंद्राबाबू नायडू, मायावती आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चांगले दावेदार ठरू शकतात, असे सांगितले होते. यामध्ये पवारांनी राहुल गांधींपेक्षा इतर तीन नावे पंतप्रधानपदासाठी अधिक प्रभावी ठरु शकतात, असे म्हणून दाखविले होते. मुलाखतीत शरद पवार यांनी निवडणुकीनंतर तयार होणाऱ्या परिस्थितीवरही भाष्य केले होते. परंतु पवारांच्या या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढविला होता

Leave a comment

0.0/5