Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने दापोली विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त झाले ३ व्हेंटिलेटर, आमदार योगेश कदमांनी मानले आभार…

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने दापोली विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त झाले ३ व्हेंटिलेटर, आमदार योगेश कदमांनी मानले आभार…

महाराष्ट्र बुलेटिन: राज्याचे पर्यावरण मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दापोली विधानसभा मतदारसंघासाठी प्राप्त झालेले ३ व्हेंटिलेटर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश कदम यांच्या हस्ते आरोग्य विभागाकडे वितरित करण्यात आले आहेत.

सदर व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याने योगेश कदमांनी आदित्य ठाकरे यांचे विशेष आभार मानले असून यामुळे रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोना काळात आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघात कोरोनावर मात करण्यासाठी विविध कामे केली आहेत. नुकतेच त्यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता तातडीने पाठपुरावा करून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासाठी २ आणि आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ अशा ३ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खेड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे व मुंबई-गोवा महामार्गालगत वृक्षारोपण उपक्रम देखील राबविला. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे असा सकारात्मक संदेश त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला.

Leave a comment

0.0/5