माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी फॅमिली हॉलिडेसाठी आयएनएस विराटचा टॅक्सी प्रमाणे वापर केला, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला आणि त्यानंतर हिंदुस्थानात एकच चर्चा सुरू आहे. गांधी कुटुंबाच्या कथित सहलीला तत्कालीन नौदल अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला असला तरी त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्या इंडियन एक्सप्रेसने समोर आणल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं जाणार आहे. मात्र त्याकाळी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील पुढे त्याची चर्चा का झाली नाही? या बातम्या कशामुळे मागे पडल्या? याचे एक महत्वाचे कारण ‘बोफोर्स प्रकरण’ असल्याचे सांगितले जात आहे.
इंडिया टूडे वृत्तसमूहाने एक बातमी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये बोफोर्समुळे या कथित फॅमिली ट्रीपवरून वृत्तपत्रांच लक्ष्य हटले, असे म्हटले आहे. पत्रकार अनिथा प्रताप यांनी सांगितल्यानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कुटुंबीयांच्या त्या सहलीबद्दल चर्चा झाली होती. मात्र काही दिवसांतच बोफोर्स घोटाळा समोर आला आणि सगळ्या मीडियाचं लक्ष या घोटाळ्याकडे गेले आणि सहलीची चर्चा गुंढाळली गेली. त्यावेळी नौदल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. पण प्रश्न तत्कालीन पंतप्रधानांचा असल्याने सर्व अधिकार गप्प होते. कुणी काहीच बोलायला तयार नव्हते, असे या वृत्तात म्हटले