Skip to content Skip to footer

दक्षिण मुंबई व दक्षिण-मध्य मुंबईतील मतमोजणी होणार शिवडीच्या गोदामात…..

मुंबई शहराच्या हद्दीतील दक्षिण मुंबई व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी यंदा शिवडी येथील बीपीटीच्या गोदामात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मतमोजणी केंद्राच्या जागा बदलून शिवडीमध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिवडी गोदामाची जागा कार्यकर्त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीची असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई शहराच्या अखत्यारित दक्षिण मुंबई व दक्षिण-मध्य मुंबई हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत तर दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे निवडणूक रिंगणात आहेत. येत्या गुरुवार, २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या गोदामातील मतमोजणीला शिवसेनेने विरोध दर्शविला आहे.

दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवडीतील मतमोजणी केंद्र गैरसोयीचे असल्याचे कळवले आहे. यासंदर्भात राहुल शेवाळे म्हणाले की, शिवडी गोदामात मतमोजणी केंद्र ठेवू नका अशी आमची मागणी आहे, पण निवडणूक आयोगाने आमची सूचना मान्य केली नाही.

Leave a comment

0.0/5