Skip to content Skip to footer

अजित पवारांच्या पराभवासाठी भाजपाची फिल्डिंग….

लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर काही महिन्यातच राज्यात विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. त्यातंच लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाचा बारामती गड काबीज करण्यासाठी भाजपाने मोठी शक्ती बारामती मतदातर संघात लावली होती. राष्ट्रवादीच्या खासदार आणि बारामतीतील यावेळीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. कुल यांच्या विजयासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभा घेतल्या. तर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे तर अनेक दिवस बारामतीतच तळ ठोकून होते. आता येणाऱ्या निवडणुकीला सुप्रिया सुळे यांच्या पुढे निर्माण केलेल्या अडचणी विधासभेला अजित पवारांन पुढे निर्माण करण्यासाठी भाजपाने फिल्डिंग लावलेली आहे.

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांना आव्हान देण्यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बारामतीत तळ ठोकणार आहेत. याआधी आम्ही बारामतीकडे संघटनाबांधणीकडे विशेष लक्ष दिले नव्हते, पण आता त्यात सुधारणा करणार, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे आता भाजपने दिलेल्या या आव्हानाला अजित पवार कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल

Leave a comment

0.0/5