राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी ज्येष्ठ भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढील काही महिने बारामतीमध्ये तळ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मी आता तेथे नियमित जाऊन पक्षाचा विस्तार व ताकद वाढविण्याचे काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत पवार यांच्या वर्चस्वाला आव्हान देत बारामतीतील जागा जिंकण्याची घोषणा भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि पाटील यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक दिवस बारामतीत मुक्काम ठोकला होता.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाटील यांना टोला लगावत आमच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी निकालाच्या दिवशी बारामतीला यावे, अशी टिप्पणी केली होती. त्यावर बोलताना मी बारामतीला गुलाल उधळण्यासाठी व मिठाई खाण्यासाठी येणारच आहे, पण ती भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजयाची असेल, असे पाटील यांनी बोलून दाखविले होते. पाटील यांच्या बारामती मधील मुक्कामाने येणाऱ्या विधानसभेचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे असेच आज समजते. येणाऱ्या विधानसभेला सुद्धा भाजपा बारामती मतदार संघात पूर्णपणे ताकतीने उतरणार आहे हे आता पाटील यांच्या बोलण्या वरून स्पेष्ट दिऊन येत आहे.