बृहमुंबई महानगर पालिकेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अमेय अरुण घोले यांनी मुंबईतील के.ई.म. रुग्णालय, परेल व भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम) येथे सर्व वॉर्ड व अनेक डिपार्टमेंटला अचानक भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच संबंधित आरोग्य खाती आणि रुग्णालयातील अधिकाऱ्याशी चर्चा करून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतलेल्या आहे. आज मनपा हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या दिवसें-दिवस वाढत असताना दिसत आहे. तसेच मुंबईत रुग्णालयात मिळत असलेल्या चांगल्या सुख-सुविधा आणि उपचारामुळे अख्या महाराष्ट्रातून रुग्ण मुंबईतील मनपा दवाखान्यात दाखल होतात. ह्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला चांगल्या प्रकारे सेवा देणे हेच आपले परम कर्तेव्य आहे असे सुद्धा घोले यांनी बोलून दाखविले होते.
काही दिवसापूर्वी एक वृत्तपत्र मध्ये दादर (पूर्व) येथील हिरकणी बसस्थानक शेजारी असलेल्या सुलभ शौचालय चालवणाऱ्या सुलभ संस्थे संधर्भात एका वृतपत्रकात विविध समस्याचा पाढा वाचण्यात आला होता. या विषयात नगरसेवक अमेय घोले यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या संदर्भात सुलभ शौचालयाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या बरोबर पाहणी करून लवकरात लवकर अपुऱ्या सुविधा चालू करण्यासाठी संस्थेला कळविले होते तसेच पुन्हा या विरोधात तक्रारी आल्या तर हे शौचालय संस्थे कडून काढून घेण्यात येईल असा इशारा सुद्धा घोले यांच्या कडून संबंधित संस्थेला दिलेला आहे.