Skip to content Skip to footer

एक्सझिट पोल नंतर विरोधकांन मध्ये फूट बैठकीला कुमार स्वामी आणि पवारांची दांडी.

एक्सझिट पोलच्या सर्वे नुसार देशात पुन्हा भाजपा पक्षाची सत्ता येणार असे भाकीत वर्तविले जात आहे. त्यातच आज भाजपाने आपल्या सर्व मित्र पक्षांसाठी बैठकी नंतर डिनरचा बेत आखलेला आहे. या बैठकीला नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे स्वतः हजर राहणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या हालचालींना सुद्धा वेग आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी दीड वाजता विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीला २१ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या बैठकीतून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी माघार घेतली आहे. त्यांचा आजचा दिल्ली दौरा काहीवेळापूर्वीच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.

तर या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्याऐवजी प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता एक्झिट पोलची आकडेवारी पाहून महाआघाडीतील राजकीय पक्ष अशाचप्रकारे बाहेर पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, सपाचे नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वीच बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या महत्त्वाच्या नेत्यांअभावी या बैठकीला कितपत अर्थ उरणार, याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केलेली आहे.

Leave a comment

0.0/5