Skip to content Skip to footer

कोल्हेंचा पराभव करत आढळराव मारणार विजयाचा चौकार………

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वच प्रसार माध्यमांनी एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर राष्ट्रवादीच्या जागा एक-दोन फरकाने वाढण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने तर सपाटून मार खाल्लेला दिसून येत आहे. परंतु महाराष्ट्रात खरी लढत ही भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होती. या सर्वात शिरूर मतदार संघाकडे सर्वचे लक्ष लागलेले होते. परंतु एक्सझिट पोलच्या सर्वेक्षणा नुसार शिरूर मतदार संघातून आढळराव पाटील पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येऊन विजयाचा चौकार मारणार असे एक्सझिट पोलचे निकाल सांगत आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीच्या एक्झिट पोलनुसार शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील झेंडा फडकवणार असल्याचे दिसून आले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात होते.विशेष म्हणजे, अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एक्झिट पोल आणि निकाल यात मोठी तफावत असते, त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ शकते, पण निकाल हा अखेर असणार आहे. असे अमोल कोल्हे यांनी म्हंटले होते. परंतु विजयचा चौकार आम्हीच मारणार असे भाकीत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वर्तविले आहे.

Leave a comment

0.0/5