Skip to content Skip to footer

काँग्रेस नेत्याचे सर्वोच्च न्यायालया विरोधात वादग्रस्त वक्तव्य….

व्हीव्हीपॅटवरुन काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी वादग्रस्त विधान केले आहे. व्हिव्हिपॅटमधील सर्व चिठ्ठ्यांची मोजणी का होऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटत आहे. तेदेखील या घोटाळ्यात सहभागी आहेत का? असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले आहे. डॉ. उदित राज यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बुधवारी उदित राज यांनी ट्विटरवरून थेट सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वाद निर्माण झाला.

व्हिव्हिपॅटमधील सर्व चिठ्ठ्यांची मोजणी का केली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटत आहे. तेदेखील या घोटाळ्यात सहभागी आहेत का? असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले. तसेच निवडणुकांमुळे गेल्या तीन महिन्यांपासून सर्व सरकारी कामे ठप्प झाली आहेत. तर व्हिव्हिपॅटच्या चिठ्ठ्यांच्या मोजणीमुळे दोन तीन दिवस लागत असतील तर काय फरक पडेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या तरी देशात लोकसभा निवडणुकीच्या एक्सझिट पोलच्या निकाला नंतर काँग्रेसचे नेते प्रसार माध्यमांन समोर काय बोलतात हे त्यांचे त्यांना माहित नाही आहे असेच बोलण्यातून जाणवते.

Leave a comment

0.0/5