Skip to content Skip to footer

विनयभंगाप्रकरणी काँग्रेसचे आमदार सुभाष धोटेंना अटक……

चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सुभाष धोटे, त्यांचे भाऊ नगराध्यक्ष अरुण धोटे यांना अटक करण्यात आली. मद्यधूंद अवस्थेत नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.सुभाष धोटे आणि अरुण धोटे संचलित कल्याण नर्सिग कॉलेज असून पीडित तरुणी या कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. कॉलेजचे प्राचार्य तिचा मानसिक छळ करत होते. याविरोधात तिने संस्थाचालकांकडे तक्रार दिली होती. मात्र, संस्थाचालक सुभाष धोटे यांनी पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी वसतीगृहाच्या प्रांगणात प्राचार्य व अन्य दोन जणांनी तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता.

याविरोधात पीडित तरुणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास गेली असता अरुण धोटे यांनी जबरदस्तीने पीडितेला तिथून उठवले आणि सुभाष धोटे यांच्या घरी नेले. सुभाष धोटे यांनी पीडितेला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडित तरुणीने सोमवारी पोलिसांकडे तक्रार दिली. अखेर पोलिसांनी रात्री धोटे बंधूंना अटक केली. आज ज्या पक्षाचे अध्यक्ष पद एका महिलेने भूषविलेले आहे त्या पक्षाच्या आमदारांच्या या वागण्यावरून त्या पक्षाची संस्कृती समोर आलेली आहे.

Leave a comment

0.0/5