Skip to content Skip to footer

सुरत तक्षशिला कॉम्प्लेक्स आगीत १९ जण मुत्यूमुखी……

सुरत शहरात मन सुन्न करणारी घटना घडलेलीं आहे. त्यामुळे संपूर्ण सुरत शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरत येथील सरथाना भागातील तक्षशीला कॉम्पलेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश विद्यार्थी होते असे समजते. अग्निशमन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर शेड टाकून क्लासेस घेतले जात होते. तेथे ही आग लागली होती. मुलांनी आगीपासून जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मजल्या वरून उड्या मारल्या होत्या. या आगीच्या धुरात १६ जणांचा मुत्यू धुराने घुसमटून झालेला आहे. तर उडी मारून पडल्याने दोन जण मृत्युमुखी पडले होते.

या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली. आग लागली त्यावेळी इमारतीत ३५ जण अडकल्याची माहिती समोर आलेली होती. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या तिसऱ्या-चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. तक्षशीला कॉम्पलेक्स हे एक कमर्शिअल कॉम्प्लेक्स आहे. यात अनेक दुकाने आणि कोचिंग सेंटर आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र एसी डक्ट्स आणि कॉम्प्रेसर्समुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशी माहिती समोर येते.

Leave a comment

0.0/5