Skip to content Skip to footer

सोशल मीडिया’ आला कामी स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब!

तीर्थक्षेत्र आळंदीत फिरत असताना आढळून आलेल्या विस्मरणामुळे जेष्ठ नागरिक सुधा सहदेव परब (वय ८०) रा.देवळी खालची जिल्हा रत्नागिरी यांना अखेर नातेवाईकांचे ताब्यात रविवारी (दि.१४) देण्यात आले.आळंदी येथील मंदिराबाहेर गुरुवारी (दि,११) रात्री रडताना कमला महादेव चव्हाण असे नाव सांगणा-या जेष्ठ नागरिक आजींना सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून आळंदी पोलीस ठाण्यात सुपूर्द  करण्यात आले. त्यानंतर आळंदी पोलिसां मार्फत किनारा वृद्धाश्रम अहिरवडे कामशेत येथे दाखल करण्यात आले होते.

या संदर्भात सोशल मीडियावर गेले दोन दिवस पोस्ट अनेक ग्रुपवर व्हाट्सअप वर फिरत फिरत बांद्रा येथे रहात असणाऱ्या त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचली. आजींचे नाव सुधा सहदेव परब असे मिळून आले. मात्र आजींचे विस्मरणामुळे तेही त्यांनी आळंदीत चुकीचे सांगितले होते. बांद्रा येथून त्या एकट्याच घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या आळंदीला कशा पोहोचल्या हे समजले नाही.

मंदिर परिसरात विस्मरणातुन फिरत असताना गुरुवारी आढळून आलेल्या जेष्ठ नागरिक सुद्धा परब यांना रडत असताना येथील नागरिकांना मला घरी घेऊन चला असे म्हणत होत्या.यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे यांनी त्यांना आळंदी पोलीस ठाण्यात पोच केले.यावेळी त्यांचे समवेत भाईचारा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुलतान शेख,ठाणे अंमलदार नितीन बनकर आदी उपस्थित होते. त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना वृद्धाश्रमात पोच करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम चिंबळी येथे मदर तेरेसा वृद्ध आश्रमात वय जास्त असलेने घेण्यात आले नाही. त्यानंतर त्यांना परत आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील कान्हे फाटा कामशेत अहिरवडे किनारा वृद्धाश्रमात संचालिका  प्रीती वैद्य यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

रविवारी (दि.१४) दुपारी दोनचे सुमारास अहिरवडे कामशेत (ता.वडगाव मावळ) येथून संचालिका श्रीमती प्रीती वैद्य यांनी परब ह्या आजीस त्यांच्या मुलीकडे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या सोबत मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदिप शिर्के,राजेंद्र नाईक, भगवान परब यांच्या समक्ष त्यांना त्यांच्या मुलीकडे सुपूर्द करण्यात आले.यासाठी मुंबई वरून शिवसेना प्रतिनिधी उदय दळवी यांनी देखील संपर्क करुन सहकार्य केले . सोशल मीडियावर फिरलेल्या संदेशाने जेष्ठ नागरिक आजीस मुलीला पुन्हा भेटण्यास मदत झाली.

Leave a comment

0.0/5