Skip to content Skip to footer

भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी – पहिल्या दिवशी धवन आणि पुजारा यांची शतके..!

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात श्रीलंका येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ ८४ ओव्हर्स मध्ये ३ विकेट्स गमावत ३७७ धावांची खेळी केली आहे. ह्यात शिखर धवन व चेतेश्वर पुजारा यांनी अनुक्रमे १९० व १३४ धावांची खेळी केली आहे. तेश्वर पुजारा व अजिंक्य राहणे १३४* व ३०* धावांवर खेळात आहेत.

ततपूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला आलेल्या अभिनव मुकुंदाला फारशी चांगली खेळी करत आली नाही. भारताने पहिली विकेट २७ धावांवर गमावली. चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली सुद्धा चांगली खेळी कारणासी अपयशी ठरला.

Leave a comment

0.0/5