Skip to content Skip to footer

शासकीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित

: आगामी मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ती योग्यरित्या हाताळण्यासाठी प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये १ जूनपूर्वी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने शासकीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत.
जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा तसेच सर्व तहसीलदार कार्यालये, पोलीस स्टेशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महावितरणच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याची कार्यवाही १ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

पोहणाºयांची माहिती संकलित
सर्व तहसीलदारांनी पोहणाºया व्यक्तींची तालुकानिहाय माहिती संकलित करावी, अशा सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार पोहणाºया व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे काम पुर्णत्वाकडे आले आहे.

साथरोग नियंत्रण पथक सज्ज
आगामी पावसाळ्यात साथरोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. साथरोगावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रात साथरोग नियंत्रण पथक तयार ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रण पथक तयार केले आहे.

नालेसफाई व दुरूस्तीचे काम पुर्णत्वाकडे
जिल्ह्यातील नगर परिषदांनी शहरातील नाले सफाई व दुरुस्तीचे काम ३० मे पूर्वी पूर्ण करावे. घनकचºयामुळे नाले तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या होत्या. तथापि, ३० मे पूर्वी शहरातील नाले सफाई व दुरूस्तीची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. जून महिन्याच्या १० तारखेपर्यंत नाले सफाई व दुरूस्तीची कामे पूर्ण होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5