बिडगाव, ता.चोपडा : लाखो रुपए खर्च करीत सहा महिने ऐन दुष्काळात लहान मुलाप्रमाणे वाढवलेल्या केळीच्या पिकाची मेहनत फळाला येत असतांनाच अस्माणी संकट कोसळुन ऐन पावसाळ्याच्या तोंडावर २ जुन रोजी आलेल्या गारपीट व वादळाने बहरलेल्या या केळीला नेस्तनाबुत करुन तोंडी आलेला घास हिरावला गेला. यामुळे केळी पिकाची नैसर्गिक प्रक्रीयाच थांबुन ते खराब होऊ लागल्याने मितावली येथील कैलास परबत पाटील यांना पाच एकरावरील ट्युशूच्या केळीवर रोटाव्हीटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली.