Skip to content Skip to footer

कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद

राज्यात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना करीत आहेत. खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी संभाजी ब्रिगेडने जिल्हा कचेरीसमोर घंटानाद करीत शासनाचे लक्ष वेधले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.

पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रूपये देण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी अंतर्गत कपात केलेली शेतकºयांची २५ टक्के रक्कम परत देण्यात यावी, रासायनिक खताची भाववाढ मागे घेण्यात यावी, खते, बी- बियाणे, कीटकनाशक कंपन्याचे राष्ट्रीयीकरण करावे, कृषिकर्जाचे सध्याचे निकष बदलून एकरी ५० हजार कर्ज द्यावे, शेती व्यवसायाला उद्योगाचा व संवैधानिक दर्जा देण्यात यावा, शेतकºयांचे २०१४ पर्यंतचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, शेतीची कामे मनरेगा अंतर्गत समाविष्ट करावे, शेतकरीविरोधी कायदा रद्द करून भाव संरक्षण कायदा करण्यात यावा,
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित व वेतन आयोगाचे धर्तीवर हमी भाव देण्यात यावा, कृषिपंप धारकांना विद्युत जोडणी तात्काळ देण्यात यावी व ती ऐच्छिक असावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचेडॉ. अभय गावंडे, जिल्हाध्यक्ष रणजित तिडके, संजय ठाकरे, अंकुश साठे, शरद काळे, कुशल देशमुख, हर्षदीप चावके, शुभम शेरकर, दीपक लोखंडे, अजित काळबांडे, गजानन मानकर आदी सहभागी होते.

Leave a comment

0.0/5