Skip to content Skip to footer

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी खासदारकीची शपथ मराठीतुन घेतली.

१७ व्या लोकसभेतील संसदेच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठीबाणा जपत मराठीतून शपथ घेतली. ही शपथ घेतीवेळीचा त्या व्हिडीओ व्हायरल झाला असून सावंत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. महाराष्ट्रात शिवसेना असा एकमेव पक्ष आहे. ज्यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा टिकावी म्हणून अतोनात प्रयत्न केले आहे. याचे पूर्ण श्रेय शिवसेना प्रमुख तथा वंदनीय हिंदूह्दय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनाच जाते हे साऱ्या महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.

काही दिवसापूर्वी मराठी शाळांतील शिक्षण आणि त्यांच्या दर्जाविषयी पालकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करण्याची गरज असून मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवत यासंदर्भात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले होते. आज देशातील केंद्रीय अवजड मंत्री दिल्लीत मराठीतून आपल्या खासदारकीची शपत घेतो ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे.

Leave a comment

0.0/5