Skip to content Skip to footer

सावरकर नायक की खलनायक प्रकरणी वृत्तवाहिनीची माफी

सावरकर नायक की खलनायक प्रकरणी वृत्तवाहिनीची माफी

स्वातंत्रवीर सावरकरांच्या जयंतीदिवशीच एका मराठी वृत्तवाहिनीने “सावरकर: नायक की खलनायक” या मुद्द्यावर चर्चासत्र आयोजित केलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनीच सावरकरांच्या कार्याबद्दल प्रश्न उपस्थित होईल अशा मथळ्याखाली चर्चासत्र आयोजित केल्याचं समजताच सावरकरप्रेमी जनतेत संतापाची लाट उसळलेली होती. सुरुवातीला सोशल मीडियावर या वाहिनीच्या विरुद्ध मोहीम चालवत सावरकरप्रेमींनी सदर वाहिनीने माफी मागावी अशी मागणी जाहीररीत्या केली होती. पुढे ही मोहीम तीव्र होत गेली आणि अनेक सावरकरप्रेमींनी सदर वृत्तवाहिनीवर असलेल्या त्यांच्या जाहिराती काढून घेत दणका दिला होता. शिवाय सावरकरप्रेमी संघटना आणि कार्यकर्ते यांनी वाहिनीने माफी मागावी अशी मागणी लावून धरली होती.

काल शिवसेना वर्धापनदिन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुद्धा हा विषय उचलून धरत सावरकर नायक की खलनायक ठरवणारे तुम्ही कोण? असा जळजळीत सवाल उपस्थित केला होता.वाहिनीविरुद्ध वाढत चाललेला रोष पाहून अखेर सदर वाहिनीने आज सपशेल शरणागती पत्करत जाहीर माफी मागितली आहे.

Leave a comment

0.0/5