Skip to content Skip to footer

दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा पाणीप्रश्न शिवसेना कायमचा सोडवणार:ही आहे योजना

 

मराठवाडा हा महाराष्ट्रातील दुष्काळात होरपळणारा भाग आहे. येथील पाणीप्रश्न अत्यंत गंभीर आहे. शिवसेनेने हा पाणीप्रश्न तात्पुरता नव्हे तर कायमचा सोडवण्याची तयारी सुरु केली आहे. जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल जन आशीर्वाद दौऱ्यात बोलताना या योजनेबद्दल माहिती दिली आहे. मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी लागतं. दरवर्षीच पुरेसा पाऊस न पडल्याने मराठवाड्यात दुष्काळ पडतो. यावर उपाय म्हणून कोकणातील वाया जाणारं पाणी हे थेट मराठवाड्यात आणण्यासाठी सरकार सध्या प्रयत्न करतंय. मराठवाड्याच्या सध्याच्या आवश्यकतेपेक्षा जास्त म्हणजेच ३५ टीएमसी पाणी हे या योजनांमार्फत मराठवाड्यात आणलं जाणार आहे. ही संपूर्ण योजना अंमलात यायला वेळ नक्कीच लागेल परंतु या योजनेमुळे मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपेल. मराठवाड्यातील सर्वात गंभीर असा पाणीप्रश्न सोडवून नंदनवन फुलवणाऱ्या योजना कोणत्या आहेत याचा थोडक्यात आढावा:

-शिवसेनेचे नूतन मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिपद स्वीकारताच भूम-परांडा परिसरात १३५ बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे.

-मराठवाड्याच्या हक्काचं २१ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आवाज उठवला.

-कोकणात वाया जाणारं ३५ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी नव्या प्रकल्पास कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.

-पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठवाड्यातील ११ धरणं पाइपलाइनच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. ही ११ धरणं भरलीच नाहीत तर पश्चिम महाराष्ट्रातील ३५ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणलं जाणार आहे.

-मराठवाड्यासाठी नदीजोड प्रस्ताव मंजूर

-कोकण खोऱ्यातील तब्बल ३०० टीएमसी जास्तीचं पाणी उपलब्ध आहे. हे पाणी मराठवाड्याला दिलं जाऊ शकत. असं केल्याने कोकणला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अन्यायाला सामोरं जावं लागणार नाही.

-कोकणात उपलब्ध १६८ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी २९ वेगवेगळे प्रकल्प मंजूर होणार आहेत.

हे प्रकल्प सुरु करण्यासाठी सरकार आगामी दीड वर्षात सर्व्हेक्षण करून काम सुरु करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल आणि मराठवाड्यात नंदनवन फुलेल.

Leave a comment

0.0/5