Skip to content Skip to footer

साई संस्थानकडून पुरग्रस्थांना १० कोटीची मदत जाहीर

साई संस्थानकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत करण्यात येणार आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच २० डॉक्टर्सची टीम पूरग्रस्त भागात मदतीसाठी जाणार आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्जीच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याची माहिती सुरेश हावरे यांनी शनिवारी दिली आहे.

राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील परिस्थिती अतिशय बिकट आहे. हजारो नागरिक बेघर झाले आहे.

नैसर्गिक आपत्ती भीषण असून राष्ट्रीय कर्तव्य समजून पूरग्रस्तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती सुरेश हावरे यांनी दिली आहे. तसेच वैद्यकीय मदत आणि औषधं पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत.

Leave a comment

0.0/5