Skip to content Skip to footer

..तर जशास तसे उत्तर देऊ:धर्मांध दंगलखोरांना शिवसेना जिल्हाप्रमुखांचा इशारा

काल हिंदू धर्मातील पवित्र श्रावण सोमवार आणि बकरी ईद एकाच दिवशी आले होते. हिंगोली शहरात शिवसेनेतर्फे पारंपरिक श्री महादेव कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेला प्रतिवर्षीप्रमाणे हजारोंची गर्दी लोटली होती. शिवसेनेच्या वतीने ही यात्रा बकरी ईद निमित्त होणाऱ्या नमाजानंतर काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच कोणत्याही प्रकारची अशांतता अथवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात आलेली होती. यानंतर सुद्धा कावड यात्रेत लावण्यात आलेल्या महादेवाच्या गीताचे आणि शिवभक्तांनी दिलेल्या हर हर महादेव आणि जय भवानी-जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांचे खुसपट काढून धर्मांध मुस्लिमांनी एकच हैदोस घातला. कावड यात्रेत सामील शिवभक्त आणि शिवसैनिकांवर काठ्यांनी हल्ला केला. तसेच दगडफेक करत मोठ्या प्रमाणावर वाहनांची तोडफोड केली गेली होती. या घटनेनंतर सुद्धा कावड यात्रा हजारो शिवभक्त आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. यावेळी बोलताना “आम्हाला ललकारू नका अन्यथा जशास तसं उत्तर देऊ” असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी धर्मांधांना दिला.

या घटनेनंतर हिंगोली शहरात काल संपूर्ण दिवस तणावाचं वातावरण होतं. शहरातील शांतता व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी दिवसभर प्रयत्न केले. त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या शिवसैनिकांची भेट घेऊन धीर दिला. तसेच शहरातील बंद झालेली बाजापेठ पुन्हा सुरु करण्याचे आवाहन व्यापारी वर्गास केले. तसेच शहर भयमुक्त होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. धर्मांधांच्या दगडफेकीनंतर सुद्धा कावड यात्रा सुखरूप आणि मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी तब्बल दहा हजार शिवसैनिक आणि शिवभक्तांची उपस्थिती होती.

जखमी शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचा फोन

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून जखमी शिवसैनिकांशी संवाद साधल्याची माहिती आहे. त्यांनी जखमी शिवसैनिकांची विचारपूस करून त्यांना धीर दिला अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

1 Comment

  • अशोक गुनवंतराव पाटील
    Posted August 24, 2019 at 11:03 pm

    आंबादास दानवे विकृमी मतानी विजई झाल्याबद्ल सरर्व मतदाराचे हार्दिक अभिनंदन.

Leave a comment

0.0/5