Skip to content Skip to footer

गुजरात बंदरांवर सतर्कतेचा इशारा : पाकिस्तानी सैन्याकडून हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाची माहिती.

गुरुवार ( २९ ऑगस्ट ) :
पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात मधील हरामी नाला भागातून कच्छ मध्ये घुसखोरी केल्याच्या माहितीवरून गुजरातमधील महत्वाच्या कांडला बंदर, मुंद्रा मधील अदानी बंदर व इतर बंदरांवरील सुरक्षा वाढवली असून तेथे सर्तकतेचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे.
दरम्यान हरामी नाला येथे सीमा सुरक्षा जवानांना दोन बेवारस पाकिस्तानी बोटी सापडल्या.
ही बातमी नौकादलाचे प्रमुख ऍडमिरल करमबील सिंह यांच्या ” पाकिस्तान स्थित अतिरेकी संघटना जैश -ए-मोहम्मद हे पाण्याखाली एक समूह बनवून हल्ला घडवण्याचे प्रशिक्षण देत आहे ” ह्या विधानानंतर आली. त्यावर भारतीय नौका दल संपूर्णपणे सुसज्ज व तयार आहे आणि असे हल्ले रोखण्यासाठी व त्यांना ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे ही त्यांनी सांगितले.

भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांमधील हा तणाव भारताने काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयामुळे वाढला आहे.

Leave a comment

0.0/5