Skip to content Skip to footer

…तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील – संजय राऊत

…तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील – संजय राऊत

लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या आणि आपल्या दुकानातून बाहेर काढणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सविरोधात शिवसेनेनेही आवाज उठविला आहे. ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अपमान करत असेल तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील!’ , अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला.

 

कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली होती.

दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली, पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी संवाद साधला. परंतु आता सराफा व्यापाराने माफी मागितली आहे. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शोभा देशपांडे यांना त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर शोभा देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना ‘मातोश्री’च्या आठवणींना उजाळा दिला .

Leave a comment

0.0/5