Skip to content Skip to footer

मतांचा विचार न करता राममंदिर प्रश्न ज्वलंत ठेवणारी शिवसेना!

मतांचा विचार न करता राममंदिर प्रश्न ज्वलंत ठेवणारी शिवसेना!
अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणीला वेग आला आहे. लवकरच ही सुनावणी पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राममंदिर खटल्याचा निकाल काय लागेल याची देशभरात सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवसेना-भाजप राममंदिरासाठी आग्रही असलेलेदेशातील दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. त्यातही मोदींनी नेतृत्व स्वीकारल्यापासून भाजपने राममंदिर विषयात जाहीर भूमिका घेणं किंवा आक्रमक होणं टाळलं असल्याने अयोध्येत राममंदिर व्हावं अशी भूमिका उघडपणे फक्त शिवसेनेनेच घेतली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मतांची गणितं जुळवण्यासाठी भाजपने आपलं हिंदुत्व सौम्य केलं. शिवसेनेने मात्र मतांचा विचार न करता राममंदिराच्या प्रश्न सातत्याने उपस्थित करत ज्वलंत ठेवला. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशभरातील तमाम हिंदू आणि रामभक्तांना राममंदिर प्रश्न सुटेल अशी आशा होती. मोदींच्या अजेंड्यावर मात्र हा विषय दिसला नाही. अशा वेळी मनातलं बोलण्याचं धाडस फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दाखवलं.

ज्यावेळी शिवसेना-भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-विहिंप-बजरंग दल आदी हिंदुत्ववादी संघटनांनी राममंदिर प्रश्नावर ज्वलंत आंदोलन केलं होत तेंव्हा कारसेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला होता. यानंतर उमटणारे पडसाद, व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आणि होणारे राजकीय परिणाम पाहून संघ-भाजपने हात झटकले. बाबरी पाडण्याशी आमचा संबंध नाही ते काम शिवसैनिकांचं असं त्यांनी जाहीर केलं. तेंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी “बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे” असं जाहीरपणे म्हटलं होतं. कोणताही नफा-तोटा लक्षात न घेता बाळासाहेबांनी केलेलं हे वक्तव्य सर्वसामान्यांनाही भावलं होतं. यामुळेच बाळासाहेब ठाकरे हे तमाम भारतातील हिंदू जनतेचे हिंदुहृदयसम्राट झाले. बाकीच्यांनी झटकलेली जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी स्वीकारून आपलं निर्भीड नेतृत्व सिद्ध केलं होतं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे हाच कित्ता गिरवला. चार वर्षांचा कार्यकाळ होऊनही भाजप राममंदिर विषय काढत नाही हे पाहून त्यांनी थेट “चलो अयोध्या” नारा दिला. भाजपला राममंदिर आश्वासनाची आठवण करून देत राममंदिर कधी होणार हे जाहीर करा किंवा तो निवडणुकीसाठी केलेला जुमला होता हे तरी जाहीर करा असं सरळसरळ आव्हान त्यांनी दिलं. “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत मागीलवर्षी ठाकरे कुटुंबीय अयोध्येत दाखल झाले.

महाराष्ट्रातून अयोध्येत जात भाजपने अडगळीत टाकलेला राममंदिर मुद्दा शिवसेनेने पुन्हा बुलंद केला. सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौरा कसा असेल याचा अंदाज मीडिया,विरोधीपक्ष,भाजप,राजकीय विश्लेषक यापैकी कोणालाच आला नव्हता. मात्र शिवसेनेची ही अयोध्यावारी ऐतिहासिक ठरली. संपूर्ण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वातावरण शिवसेनामय झालं. उद्धव ठाकरेंचं नाव जगभर गाजलं. देशात एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राज्यात जाऊन एखाद्या प्रश्नावर आवाज उठवत शक्तिप्रदर्शन करण्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना ठरली. पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याची हिंमत देशात केवळ उद्धव ठाकरेंनी दाखवली. यामुळे संपूर्ण बहुमत असूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाची झोप उडाली. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी पंढरपुरातील २७ एकर एवढ्या प्रचंड मैदानावर लाखोंची सभा घेत राममंदिर प्रश्न उचलून धरला. या सभेने अनेक धुरंधरांचे धाबे दणाणले तर चाणक्यांचे डोळे विस्फारले.शिवसेनेचे १८ खासदार लोकसभेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत दर्शनासाठी गेले आणि तिथे त्यांनी पुन्हा राममंदिर मुद्दा बुलंद केला.

राममंदिर खटल्याचा निकाल आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी सज्ज राहावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राममंदिर निकाल लागताच मंदिर बांधण्यासाठी अनेकजण धावतील परंतु राममंदिर बांधकामाची पहिली वीट रचण्याचा हक्क आणि मान केवळ तो प्रश्न ज्वलंत ठेवणाऱ्या शिवसेनेचाच राहील.

शिवसेनेच्या अयोध्यावारीचा प्रभाव:ठिकठिकाणी उभी राहिली राममंदिर प्रतिकृती

Leave a comment

0.0/5