Skip to content Skip to footer

दिल्लीकर श्वास कसा घेणार? सर्वोच्च न्यायालयाची केजरीवालांना विचारणा

देशाची राजधानी नवी दिल्लीतील वायूप्रदूषण कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. यामुळे दिल्लीतील नागरिक बेजार झाले आहेत. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे.दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबतच्या प्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला सुनावले आहे.

तसेच ‘ऑड-इव्हन योजना ही वायूप्रदूषण कमी करण्याचा मार्ग असू शकत नाही. दिल्लीतील लोकांना प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत आहे.’ असे म्हणत न्यायालयाने दिल्लीतील नागरिक श्वास कसा घेणार, असा सवाल केजरीवाल सरकारला केला आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला प्रदूषणाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी व दिल्लीची हवा स्वच्छ करण्यासाठी एअर प्युरिफायर टॉवर्स बसविण्यासाठी दिल्लीच्या मार्गांचे नकाशे तयार करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम लक्षात घेता आता दिल्ली सरकार ऑड इव्हन लागू करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, प्रदूषणाची पातळी समान राहिल्यास सरकार ऑड-इव्हन लागू करण्याचा पुनर्विचार करू शकते.’

Leave a comment

0.0/5