Skip to content Skip to footer

संसदेच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सेना खासदार आक्रमक

संसदेच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सेना खासदार आक्रमक
एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेना पक्षाची जागा आता विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची झालेली आहे. एकीकडे शिवसेना राज्यात राष्ट्र्वादी आणि काँग्रेस बरोबर महाशिवआघाडी करून सत्तेत बसणार आहे. तर दुसरीकडे संसदेत सुद्धा शिवसेना पक्षाने आपल्या भाजपा या मित्रपक्षाची साथ सोडलेली आहे. आता विरोधी पक्षाच्या बाकावर बसताच राज्यात पडलेल्या ओल्या दुष्काळ संदर्भात शिवसेना खासदारांनी सरकार विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असून, केंद्रानं अतिरिक्त मदत देण्याची मागणी करीत शिवसेनेनं या मुद्यावर लोकसभेत तहकूब नोटीस दिली. त्याचबरोबर अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर लोकसभेतून सभात्याग केला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असून, शेतकऱ्यांना २५ हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे.

Leave a comment

0.0/5