Skip to content Skip to footer

हिमस्खलनात 4 जवानांसह सहाजण मृत्युमुखी

जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन त्याठिकाणी गस्तीपथकातील 4 जवानासह दोन हमाल मृत्युमुखी पडले आहेत. दुपारी साडे तीनच्या सुमारास हिमस्खलन होऊन त्यात 8 जवान अडकले होते.सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ ही दुर्घटना घडली असून हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 18 हजार फूट उंचीवर आहे. हिमस्खलनानंतर याठिकाणी तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सियाचीनमधील कारकोरम भागात ही घटना घडली. या भागात अत्यंत प्रतिकूल स्थितीत भारतीय जवान पहारा देत असतात.

गस्तीवर असलेले 8 जवान या ठिकाणी अडकल्याची माहिती मिळताच तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आठही जवानांना बर्फाच्या ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आले. यातले सातजण गंभीर जखमी होते. हॅलिकॉप्टरच्या साहाय्याने जवानांना जवळच्या लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र यात 4 जवानासह दोन हमाल मृत्युमुखी पडले आहेत. 1984 पासून आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानने सर्वात उंचीवरील या युद्धभूमीवर सर्वाधिक जवान गमावले आहेत. 2016 मध्ये याच भागात हिमस्खलनामुळे 10 जवानांना आपला जीव गमवावा लागला होता.

Leave a comment

0.0/5