Skip to content Skip to footer

‘फ्लिपकार्ट’वर Year End Sale, अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट आणि शानदार ऑफर्स

ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर Year End Sale येत्या 21 ते 23 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये अनेक शानदार ऑफर्स आहेत. फ्लिपकार्टने एका टीझर पेजद्वारे स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या ऑफर्सबाबत माहिती दिली आहे. हा 2019 वर्षातील बेस्ट ऑफर सेल असल्याचा कंपनीचा दावा आहे. सेलमध्ये कोणतीही वस्तू ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. ही सवलत ईएमआय ट्रांझेक्शनवर देखील असेल. जाणून घेऊया काय आहे ऑफर्स –

सॅमसंग स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट :
या सेलमध्ये 34,449 रुपयांच्या सॅमसंग S9 या स्मार्टफोनच्या 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची विक्री 27,999 रुपयांमध्ये होईल. तर, 37,999 रुपयांचा सॅमसंग S9+ हा स्मार्टफोन 34,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 18,900 रुपयांचा सॅमसंग A30S (4जीबी रॅम +64जीबी स्टोरेज) 15,999 रुपये, 70 हजार रुपयांचा S9 प्लस (6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज) 29,999 रुपये आणि 21 हजार किंमतीचा सॅमसंग A50 स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये मिळेल.

ओप्पोच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट :
Year End Sale मध्ये 29,990 रुपयांचा ओप्पो F11 प्रो (6जीबी+128जीबी व्हेरिअंट) 16,990 रुपयांमध्ये मिळेल. तर, 18,990 रुपयांचा ओप्पो A7 (4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज) 9,990 रुपये आणि 21,990 रुपयांचा ओप्पो F11 (4जीबी रॅम +128जीबी स्टोरेज) 12,990 रुपयांमध्ये मिळेल.

फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर भरघोस सवलत :
अनेक कंपन्यांच्या लोकप्रिय फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर भरघोस सवलत आहे. सेलमध्ये गुगल पिक्सल 3a XL (4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज) 30,999 रुपयांमध्ये, आयफोन 7 (32जीबी व्हेरिअंट) 24,999 रुपयांमध्ये, सॅमसंग A70S स्मार्टफोन 28,999 रुपयांमध्ये आणि गुगल पिक्सल 3 स्मार्टफोन 42,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.यांची अनुक्रमे किंमत 44,999 रुपये, 29,900 रुपये, 28,999 रुपये आणि 71 हजार रुपये आहे. याशिवाय सेलमध्ये आयफोन 11 मालिकेतील स्मार्टफोन्स 64,900 रुपयांच्या बेसिक किंमतीसह उपलब्ध असतील.
ऑनर स्मार्टफोन्सवर बेस्ट ऑफर :
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये 13,999 रुपयांचा ऑनर 10 लाइट 7,999 रुपयांमध्ये, 16,999 रुपयांचा ऑनर 20आय 10,999 रुपयांमध्ये आणि 19,999 रुपयांचा ऑनर 9एन स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय 14,999 रुपयांचा ऑनर 8सी (4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज) 7,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.
स्वस्त मिळणार नोकिया आणि आसुसचे स्मार्टफोन : 
नोकिया आणि आसुसच्या स्मार्टफोन्सवरही डिस्काउंट आहे. नोकिया 7.2 हा स्मार्टफोन 16,599 रुपये, नोकिया 6.1 प्लस 8,999 रुपये आणि नोकिया 2.2 हा स्मार्टफोन 5,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, आसुस मॅक्स एम1 स्मार्टफोन 5,999 रुपये, मॅक्स प्रो एम1 फोन 7,999 रुपये आणि आसुस 5झेड 15,999 रुपयांमध्ये मिळेल.

Leave a comment

0.0/5