महाराष्ट्र बुलेटिन : नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी विखे शैक्षणिक संस्थेमध्ये शिर्डी मतदारसंघातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकरीता ५० टक्के फी मध्ये सवलत दिल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टी, अहमदनगर ओबीसी मोर्चाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या काळात विखे-पाटील साहेबांनी सर्व ओबीसी समाजाच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना फी माफ केल्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या विद्यार्थी हिताच्या निर्णयाचे आभार मानण्यासाठी व धन्यवाद म्हणण्यासाठी भाजपा, अहमदनगर ओबीसी मोर्चाच्या वतीने त्यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान त्यांच्या या निर्णयाचे पूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत असून इतर नेत्यांनाही ज्यांच्या अखत्यारीत शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी देखील अशा प्रकारे शैक्षणिक फी माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम करावे असे आवाहन राधाकृष्ण विखेंनी केले होते.
या सत्कारादरम्यान अहमदनगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष नारायण धोंगडे, सनी कांबळे, ऋषिकेश डहाळे, अक्षय वाणी, प्रतिक धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.