Skip to content Skip to footer

शेवरोबा मंदिर वर्धापन दिनाला आमदार योगेश कदम यांची हजेरी

शेवरोबा मंदिर वर्धापन दिनाला आमदार योगेश कदम यांची हजेरी

दापोली मतदार संघाचे आमदार योगेश रामदास कदम यांनी आलाटीवाडी येथील श्री शेवरोबा मंदिराच्या वर्धापन दिनाला हजेरी लावली. या सोहळ्याला त्यांच्या सोबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात आयोजित केलेल्या सत्यनारायन महापूजेचे सुद्धा दर्शन घेतले. अतिउस्साहात पार पाडलेल्या या सोहळ्याला आमदार योगेश कदम यांनी तेथील जनतेशी मुक्त संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कदम यांचा हा साधेपणा पाहून नागरिक सुद्धा भारावून गेले होते.

सदर कार्यक्रमाला उपस्थित राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आमदार योगेश कदम यांचे आभार मानले. आज गावातील विकासाबद्दल कदम यांनी केलेली कार्य आणि त्यांची तळमळ पाहून मंत्री अदिती तटकरे सुद्धा भारावून गेल्या होत्या. तसेच अजून सुद्धा मंदिरात वीज पोहचली नसल्याचे कदम यांच्या लक्षात आल्यावर  त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना लवकरात लवकर मंदिरापर्यंत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तर दिले पण त्यावर न थांबता तात्काळ दोन तासात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना त्यासंदर्भात सर्व्हे करण्याचे आदेश दिले.

तसेच आमदार कदम यांच्यासोबत जि. प. सदस्य श्री अण्णा कदम, युवासेना जिल्हाधिकारी श्री अजिंक्य मोरे, सभापती श्री विजयराव कदम, उपसभापती श्री जीवन आंब्रे, उपनगराध्यक्ष श्री सुनील दरेक, विभागप्रमुख श्री संदीप कांबळे, श्री निलेश शेठ, श्री दर्शन महाजन, श्री स्वप्नील सुर्वे, श्री वाहिद ममतुले, शिवसेन, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“खोटं बोल पण रेटून बोल” भाजपा आयटी सेलची करामत

Leave a comment

0.0/5