Skip to content Skip to footer

डॉ श्रीकांत शिंदे फॉउंडेशन तर्फे कल्याण फेस्टिवलचे आयोजन

डॉ श्रीकांत शिंदे फॉउंडेशन तर्फे कल्याण फेस्टिवलचे आयोजन

                डॉ श्रीकांत शिंदे फॉउंडेशन आणि अजिंक्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे उद्यान येथे कल्याण फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. या फेस्टिवलचे उदघाटन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या जल्लोषात या फेस्टिवलचे उदघाटन करण्यात आले. या फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना मधुर संगीत कार्यक्रमाचा आस्वाद सुद्धा घेता आला.

                   ४ फेब्रुवारी या उदघाटना दिवशी खासदार शिंदे यांचा वाढदिवस असल्यामुळे तेथील उपस्थित जनतेकडून तसेच शिवसैनिक आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या उस्साहात शिंदे यांच्यासाठी आणलेला केक कापून वाढदिवस साजरा केला गेला.

                हा फेस्टिव्हल ४ ते ९ फेब्रुवारी पर्यंत सुरु असून यामध्ये शस्त्र प्रदर्शन असून गड किल्ल्यांचे छायाचित्रे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये केलेल्या चित्रकलेचे प्रदर्शन तसेच महाराष्ट्रभरातील संपूर्ण संस्कृती तसेच खाद्य संस्कृतीचा आस्वाद तसेच वारकरी संप्रदायाचे अधयु आदरणीय प.पू. ह.भ.प. श्री. बाबामहाराज सातारकर यांचे जाहीर किर्तन सुद्धा होणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत पोवाडा सादर करण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5