लंडन : उद्या इंग्लंडमधल्या लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर उद्या वुमेन्स वर्ल्ड कपची फायनल मॅच होणार आहे ह्या मॅचसाठी तिकिटांची विक्रमी विक्री झाली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ इंग्लंडसोबत दोन हात करणार असून, या सामन्यासाठी 26 हजार 500 हून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे.
विशेष म्हणजे, महिलांच्या मॅचसाठी स्टेडियममध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची हजेरी सुद्धा महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असणार आहे.
तसंच, यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला वर्ल्ड कपच्या सर्व सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्टही पहिल्यांदाच करण्यात आलं. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जर भारताच्या महिला ब्रिगेडनं यंदाचा वर्ल्ड कप जिंकला, तर हा खऱ्या अर्थानं भारतीय महिला क्रिकेटसाठी आणखी एक इतिहास असणार आहे.