Skip to content Skip to footer

कोरोनाच्या भीतीने सर्दी खोकलाच्या औषधाच्या मागणीत वाढ.

कोरोनाच्या भीतीने सर्दी खोकलाच्या औषधाच्या मागणीत वाढ.

सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोना आजाराची प्रथम लक्षणे असल्याने यापैकी काहीही आजार होताच लोक लगेच त्यावरची औषधे घेत आहेत. त्यामुळे या आजारांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची मागणी आता दुप्पटीने वाढली आहे. आजार नसलेलेही काळजीमुळे या औषधांचा साठा करत आहेत.

‘करोना संसर्ग आजाराची प्रथम लक्षणे म्हणजे घशात खवखव होणे, वारंवार शिंका येणे, डोकेदुखी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे दिसतात. ही सर्वसाधारण सर्दीचीही लक्षणे आहेत. एरवीही या तक्रारी सामान्यच्या श्रेणीत येतात. डॉक्टर यासाठी पॅरासिटामोल, अजिथ्रोमायसिन अशी औषधे देतात. त्यामुळे लोक आधीच ही औषढे घेऊन ठेवू लागले आहेत. क्लोरोक्वीन हे ‘कोरोना’च्या आजारावर उपयोगी असल्याची चर्चा सध्या देशभरात आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशनशिवाय लोक ही औषधे मागत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मात्र याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘कोरोनासारख्या भयंकर आजारात काळजी घेणे आवश्यक आहे, यात वाद नाही. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे योग्य नाही. काही त्रास वाटत असेल तर जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या आणि त्यांच्या सूचनेनुसारच काळजी घ्या,’ असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5